आळंदीत वारीची लगबग सुरू

June 23, 2011 10:11 AM0 commentsViews: 17

23 जून

थोर बहु ती आळंदी, थोर बहू तो ज्ञानिया सुखाचे आगर, पाठीराखा विठूराया

ज्ञानियाच्या आळंदीत वारीची लगबग सुरू झाली आहे. इंद्रायणीसह अवघी आळंदी आता वारकर्‍यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आज रात्री 10 वाजता म्हणजे ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

त्यासाठी माऊली मंदिरात सेवेकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. पालखीसाठीच्या मानाच्या बैलजोड्याही तयार आहेत. आळंदीची दुकानंही धार्मिक, वारकरी संप्रदायासाठी लागणार्‍या वस्तूंनी सजली आहे. तुळशीमाळा, टाळ, मृदुंग, बुक्का, चंदनवाट्या यांनी दुकानं भरली आहे. आता आळंदीला वाट आहे ती माऊली माऊलीचा गजर करत धावत येणार्‍या भान हरपून नाचणार्‍या साध्या भोळ्या वारकर्‍यांची…

close