नागपुरात पाण्याच्या टाक्या 7 वर्षांपासून अस्वच्छ !

June 23, 2011 1:47 PM0 commentsViews: 2

अखिलेश गणवीर, नागपूर

23 जून

पावसाळा सुरू झाला आहे पण शहरात स्वच्छता राखण्याऐवजी नागपूर महापालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. शहरातील पाण्याच्या टाक्या गेल्या सात वर्षांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. या टाक्यांमधून एक, दोन नाही तर सात-सात ट्रक गाळ भरला आहे. पण महापालिकेचं या गोष्टीकडे लक्षच नाही.

नागपूर शहरातील दहा झोनमध्ये पाण्याच्या जवळपास पन्नास मोठ्या टाक्या आहेत. दर दोन वर्षांनी या टाक्यांची स्वच्छता व्हायला हवी. पण या टाक्यांची स्वच्छता सात वर्षांपूर्वी करण्यात आली होती. टाक्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे या टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता तर कमी झालीच आहे, शिवाय दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलं आहे.

ऐंशी टक्के हे रोग दुषित पाण्यामुळेच होतात असं डॉक्टर सांगतात. पण महापालिकेला याची फिकीर नसल्याचे असल्याचंच चित्र आहे. साफ – सफाई झाली नसल्याने टाक्यांतल्या पाण्यात विषारी घटक वाढत आहे. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, कॉलरा सारख्या रोगांचा संसंर्ग होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या टाक्यांची सफाई दर दोन वर्षांनी करणं अपेक्षित असतं. पण नागपूर महापालिकेने मात्र याकडे सोयीस्कतर दुर्लक्ष केलं.

close