सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बेसुमार वृक्षतोड

June 23, 2011 4:53 PM0 commentsViews: 91

23 जून

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. पण वनाधिकार्‍यांनी यावर काहीच कारवाई केलेली नाही. यावल अभयारण्यातील वनाधिकारी यू.एम.जाधव यांच्याविरुद्ध यावल कोर्टात गुन्हा झाला आहे. सातपुडा अभयारण्यातील 5 गावांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून ही जंगलतोड सुरु आहे. मात्र वनाधिकार्‍यांच्या संगनमतानेच ही वृक्षतोड होतेय असा आरोप होत आहे. या प्रकरणाची कोर्टाने स्वत : दखल घेतलीय आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे.

close