अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्य कपातीची योजना जाहीर

June 23, 2011 6:11 PM0 commentsViews: 5

23 जून

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातून सैन्य कपातीची योजना जाहीर केली. या वर्षाअखेर दहा हजार सैन्य माघारी बोलवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जुलैपासून या कारवाईला सुरुवात होईल. 2012 पर्यंत टप्प्याटप्प्याने 33 हजार सैनिकांना माघारी बोलावण्यात येणार आहे. तालिबानचा बिमोड करण्यासाठी दहा वर्षांपासून अमेरिका आणि नाटोचं सैन्य अफगाणिस्तानात आहे. पण ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर सैन्य माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येतेय.

close