राज्यभरातील 77 सोनोग्राफी सेंटर केले सील ; सरकारची धडक कारवाई

June 24, 2011 10:15 AM0 commentsViews: 12

24 जून

परळी इथं चार महिन्यापूर्वी 'लेक बचाव अभियाना'च्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी परळी येथील डॉ.सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलवर गर्भलिंग निदानाचे स्टींग ऑपरेशन केलं होतं. यात त्यांना यश येऊन डॉ.सुदाम मुंडेंना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी काल न्यायालयात सुनावणी झाली. यात सुदाम मुंडेंना 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

आयबीएन लोकमतनंही बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण लावून धरलं होतं. त्याला यश येऊन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्यमंत्री फौजीया खान यांनी आज बीड इथं स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासंदर्भात बोलावली आहे. या बैठकीत आठ जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि काही एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

दरम्यान, आरोग्य विभागाने राज्यातल्या 77 सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करून ती सील केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण वाढलं आहेत. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती.

सरकारने याची दखल घेऊन पुण्यातल्या 9, जळगाव 6, उस्मानाबाद 5, नाशिक 5, नवी मुंबई 4, परभणी 4, नांदेडमध्ये 3, जालना 3, धुळे 3, लातुर 2, हिंगोली 2, बुलढाणा – 2 मिरा भाईंदरमधल्या 1 आणि रत्नागिरीतल्या एका सोनोग्राफी संेटरवर कारवाई केली आहे.

close