टीम इंडियाची विजयी सलामी ; विंडीजवर 63 धावांनी मात

June 24, 2011 10:34 AM0 commentsViews: 2

24 जून

विंडीज दौर्‍यात वन डे पाठोपाठ टेस्ट सीरिजमध्येही भारताची सुरुवात विजयाने झाली आहे. जमैका टेस्ट भारताने चौथ्याच दिवशी 63 रननी जिंकली आहे. विंडीजमधील भारताचा हा पाचवा टेस्ट विजय आहे.

जमैका टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी हव्या होत्या सात विकेट तर विंडीजला आणखी 185 रन पण कालच्या स्कोअरमध्ये आणखी सतरा रनची भर घालून डेरेन ब्राव्हो आऊट झाला. तेव्हाच मॅचचा निकाल बर्‍यापैकी स्पष्ट झाला. प्रवीण कुमारने त्याला चक्क क्लीनबोल्ड केलं.

आपल्या पुढच्याच ओव्हरमध्ये प्रवीणनेच चंद्रपॉलला आऊट केलं तेव्हा तर भारतीय टीममध्ये एकच जल्लोष झाला. कारण विंडीज बॅटिंगमधील उरलीसुरली ताकदही संपली होती. त्यापाठोपाठ बाघही डकवर आऊट झाला. तेव्हा स्कोअर होता सहा विकेटवर 150 रन.

पण विंडीज शेपूट वळवळलं. शेवटच्या चार बॅट्समननी तब्बल एकशे बारा रनची भर घातली. कॅप्टन डॅरन सॅमीने 3 सिक्स मारत फटकेबाजी करत 25 रन केले. पण अखेर अमित मिश्राने त्याला लक्ष्मणकडे कॅच द्यायला भाग पाडलं. थोड्याच वेळात ब्रँडन नॅशचाही प्रतिकार संपला. त्यालाही मिश्रानेच आऊट केलं.

विजय हातातोंडाशी आलेला असताना रवि रामपॉल आणि फिडेल एडवर्ड्स या जोडीने मात्र भारताला विजयासाठी रखडवलं. रामपॉलने 1 सिक्स आणि सहा फोर मारत 34 रन केले. अखेर ईशांत शर्माच्या बॉलिंगवर किपर धोणीकडे कॅच देऊन तो आऊट झाला.

बिशू आणि एडवर्ड्स या शेवटच्या जोडीला आऊट करण्यासाठी धोणीला रैनाच्या हातात बॉल द्यावा लागला. त्याने सहा ओव्हर टाकल्या. आणि अखेर बिसूला क्लीनबोल्ड करत भारताला मॅच जिंकून दिली.

close