महिलांनाही अनैतिक संबंधात शिक्षेची तरतूद असावी !

June 24, 2011 11:46 AM0 commentsViews: 17

24 जून

अनैतिक संबंध ठेवल्यास महिलांनाही शिक्षेची तरतूद असावी असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. आयपीसीच्या कलम 497 (ऍडल्टरी) नुसार, पुरुषाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्यास पत्नीला किवा अन्य कोणालाही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

त्यासाठी कायद्यानुसार पाच वर्षाची शिक्षा, दंड अथवा शिक्षा आणि दंडही असे दोन्ही होऊ शकतो. महिलेला दिलेल्या या अधिकाराच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्याएवजी त्यात कायदेशीर दुरुस्ती करुन विवाहित महिलांनाही शिक्षेच्या कक्षेत आणावे असे मत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. एच. मार्लपल्ले आणि न्यायमूर्ती यु.डी. साळवी यांच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे.

ही तरतुद गरजेची असल्याचे मत व्यक्त करताना विवाह संस्था आणि सामाजिक मूल्येही महत्वाची असल्याचे उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मुंबईतल्या वरळीतील दिपक मिरवानी यांनी आयपीसीच्या कलम 497 च्या घटनात्मक वैधतैला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. यावर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे मत व्यक्त केले आहे.

close