एक बिबट्या विहीर के अंदर…

June 24, 2011 12:02 PM0 commentsViews: 7

24 जून

अहमदनगर निबलक शिवारातील माळवाडी भागात शिवाजी कोतकर यांच्या शेतातील विहिरीत आज पहाटे बिबट्या पडला. सकाळी शिवाजी कोतकर विहीरीवर वीजपंप चालू करण्यासाठी गेले असता कोतकर यांना विहिरीतून डरकाळी ऐकू आल्यामुळे बिबट्या विहिरीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. या बिबट्याला विहीरीतून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाचे अधिकारी ही इथं पोचलेले आहेत.

close