एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूने हल्ला

June 24, 2011 4:51 PM0 commentsViews: 5

24 जून

मुलूंडमध्ये 12 वीत शिकणार्‍या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू चे वार करण्यात आला आहे. मंगेश देशमुख नावाच्या तरुणाने तिच्यावर वार केले. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी जात असताना मंगेशने रस्त्यात गाठून चाकूने मानेवर वार केले. सध्या या युवतीला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगेशने तिला लग्नासाठी मागणी घातली होती पण तिनं आणि तिच्या घरच्यांनी त्याला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन मंगेशनं हा हल्ला केला. दोघेही ठाण्याच्या वागळे इस्टेट इथं राहणारे आहेत. मंगेश सध्या फरार असून त्याच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close