महायुतीच्या ‘एटीएम’मधला ‘टी’ फॉर तावडे !

June 24, 2011 1:05 PM0 commentsViews:

24 जून

शिवशक्ती-भिमशक्तीमुळे राजकारणात चर्चेत असलेल्या एटीएमचा लाँग फॉर्म म्हणजे आठवले ठाकरे मुंडे – मुनगंटीवार असल्याचं सांगत टी फॉर तावडे ही भविष्यात येऊ शकतं असं वक्तव्य तावडे यांनी केलं. भाजपचे नाराज नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपली नाराजीचे दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे समाधान करून मुंबईत दाखल होताच नितीन गडकरींवर टीका केली होती. मुंडेंच्या टीकेचा तावडे यांनी समाचार घेतला.

ज्या कार्यक्रमासाठी तावडे पुण्यात आले होते त्या कार्यक्रमासाठी अजित पवार हजर राहणात होते. पण तावडे आणि पवार एकत्र आल्यानंतर पुणे पॅटर्नची चर्चा झाली असती असं सांगत पुणे पॅटर्नची चर्चा होते मात्र लातूर पॅटर्नची होत नाही.

गेल्याच आठवड्यात लातूर पॅटर्ननं दगाफटका केल्याचे विधान करत तावडे यांनी मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या राजकीय जवळीकीवर अप्रत्यक्ष शरसंधान केलं. तसेच पुणे पॅटर्नमध्ये आम्ही लक्ष्मणरेषा कधी ओलांडली नाही असा जोरदार टोला काँग्रेसच्या उंबरठ्यावरून परत आलेल्या मुंडेंना लगावला.

close