राज्यभरातून दरवाढीचा निषेध

June 25, 2011 9:38 AM0 commentsViews: 7

25 जून

पश्चिम बंगालच्या निवडणुका होताच केंद्र सरकारने अगोदर पेट्रोलच्या दरात 5 रूपयाने वाढ केली. आणि काल घरगुती गॅस, डिझेल आणि रॉकेलचं दर वाढवले. राज्यभरातून या दरवाढीचा निषेध होत आहे. पुण्यात शिवसेना आणि भाजपच्या वतीने दरवाढीच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

औरंगाबादमध्येही भाजपच्या वतीने दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. तर पुण्यात शिवसेना महिला आघाडीनं रस्त्यावर चूल पेटवून भाकर्‍या भाजल्या तर पुरूष कार्यकर्त्यांनी सिलेंडर हातगाडीवर ठेवून भंगारात विकायला नेले. भाजपनेही गॅस, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन केलं. सर्वसामान्यांना सरकारने धक्का दिला. डिझेलच्या किंमतीत दर लिटरमागे 3 रुपयाने वाढ झाली. तर घरगुती गॅस तब्बल 50 रुपयांनी महागला. तर केरोसीनच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे.

महागाईचा भडका ; राज्यातली भाववाढ- मुंबईडिझेल आता- 45.06 रुपये पूर्वी- 42.06 रुपये घरगुती गॅस आता- 400 रुपये पूर्वी- 350 रुपये- पुणेडिझेल आता- 45 रुपयेपूर्वी- 42 रुपयेघरगुती गॅस आता- 397 रुपये पूर्वी- 347 रुपये- औरंगाबाद

डिझेल

आता – 45.55 रुपये पूर्वी – 41.81 रुपये

घरगुती गॅस

आता – 410 रुपये पूर्वी – 351.48 रुपये

- नागपूर

डिझेल

आता – 45.80 रुपयेपूर्वी- 42.80 रुपये

घरगुती गॅस

आता- 423 रुपयेपूर्वी – 363 रुपये

- कोल्हापूर

डिझेल

आता- 47.50 रुपयेपूर्वी- 43.58 रुपये

घरगुती गॅस

आता- 410.95 रुपयेपुर्वी- 358.60 रुपयेरत्नागिरी डिझेल आता- 45.46 रुपयेपूर्वी- 41.76 रुपयेघरगुती गॅस आता- 398 रुपयेपूर्वी- 348 रुपये

close