चाच्यांच्या तावडीतून भारतीय खलाशी सुखरुप परतले

June 24, 2011 2:24 PM0 commentsViews: 5

24 जून

सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले सहा भारतीय खलाशी आज भारतात सुखरूप परतले. एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले 22 खलाशी गुरुवारी पाकिस्तानातल्या कराची बंदरात दाखल झाले होते. पाकिस्तानातून हे सगळे खलाशी आज भारतात परतले आहे. तब्बल दहा महिन्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर खलाशांना अश्रु अणावरण झाले. या खलाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात स्वागत केलं.

close