मनमाडमध्ये पेट्रोल भेसळ करताना टँकर पकडला

June 24, 2011 2:27 PM0 commentsViews: 1

24 जून

यशवंत सोनवणे हत्याकांडानंतरही तेल भेसळ रोखण्याचा सरकारचा दावा फोल ठरला आहे. पेट्रोल भेसळ करताना एका टँकरला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मनमाडजवळ ही पेट्रोल भेसळ सुरू होती. हा टँकर औरंगाबादकडे जात होता. मनमाड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. शिवाय त्यांच्याकडून पेट्रोल कंपनीच्या बनावट चाव्यासुद्धा सापडल्या आहेत.

close