दलित नेत्याला गावकर्‍यांनी मंदिरात प्रवेश नाकारला

June 25, 2011 11:26 AM0 commentsViews: 6

25 जून

पुरोगामी भारताच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना ओरिसामध्ये घडली आहे. ओरिसामध्ये अनुसुचित जातीजमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष पी.एल.पुनिया यांना दलित असल्याच्या कारणावरून पुरीमधील गावातल्या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. या मंदिरात दलितांना पूजेची परवानगी नसल्याच्या तक्रारी इथल्या ग्रामस्थांनी केल्या होत्या.

त्याचीच शहानिशा करण्यासाठी पुनिया या मंदिरात गेले. तेव्हा त्यांना मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात आला. मात्र मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याची परवानगी इथल्या पुजार्‍यांनी पुनिया यांना नाकारली. या घटनेनं आपल्याला धक्का बसल्याचे पुनिया यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी कठोर पावलं उचलण्याची मागणी पुनिया यांनी केली. तर ओरिसा राज्य सरकारने या प्रकरणी तपास करणार असल्याचं म्हटलं आहे.

close