हरिनामाच्या गजरात पालखींचा संगम सोहळा

June 25, 2011 3:05 PM0 commentsViews: 8

25 जून

ज्ञानेश्वर माऊलीं…ज्ञानराज माऊली तुकारामचा गजर करत आणि हरिनामाच्या गजरात माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालाखीचा संगम सोहळा पुणेकरांनी अनुभवला. जुन्या मुंबई पुणे हायवेवर मरीआई गेटपाशी या पालख्यांचा संगम झाला. त्यावेळी एकच गजर करत वारकर्‍यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.

हा संगम फक्त पुण्यात आणि वाखरीतच पाहायला मिळतो. संगमानंतर पुण्यातल्या पासोड्या विठ्ठल मंदिरातून पुढे गेल्या. पुणे महापालिकेच्या हद्दीवर या दोन्ही पालख्यांचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.आता माऊलींची पालखी पासोड्या विठोबापाशी मुक्कामाला असेल. तर तुकोबारायांच्या पालखीचा मु्‌क्काम नाना पेठेतल्या निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. हे 2 दिवस पालख्या पुण्याचा पाहुणचार आटोपून पंढरीसाठी प्रस्थान ठेवतील.

close