केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबद्दलाची शक्यता

June 25, 2011 4:34 PM0 commentsViews: 5

25 जून

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेररचना होण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही फेररचना होईल अशी शक्यता आहे. काही मंत्र्यांची खातीही बदलली जाऊ शकतात. केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन 1 ऑगस्टपासून सुरू होतंय. त्याआधीच मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा पंतप्रधानांचा विचार आहे. याबाबत पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालय तृणमूलकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुकुल रॉय यांचं नाव आघाडीवर आहे. काही निष्क्रिय मंत्र्यांचे पदं जाण्याची शक्यता आहे. त्यात हायवे मिनिस्टर सी. पी. जोशी आणि ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे स्कॅनरखाली आहेत. तर, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासारख्या तरुण मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

close