महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली – मायावती

June 25, 2011 4:39 PM0 commentsViews: 3

25 जून

महाराष्ट्रातसुद्धा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे असा आरोप उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायवती दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी चेंबूरमधील बहुजन समाज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी घटनांवर बोट ठेवलं.

पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणे हत्याकांडाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात बलात्कार आणि हत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यावरून मायावती सरकार अडचणीत आलंय. असं असताना मायावतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर टीका केली.

close