मनमाडमध्ये तेलमाफियांचा हैदास सुरूच

June 26, 2011 9:41 AM0 commentsViews: 7

26 जून

नाशिकच्या मनमाडमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड घडून काही महिने उलटत नाही तोच तेलमाफियांचा हैदास पुन्हा सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसांत आता दुसर्‍यांदा तेलभेसळ करणार्‍या टँकरला पोलिसांनी पकडलं आहे. मालेगाव रोडवरील ललवाणी पेट्रोल पंपावर डिझेल चोरी करणार्‍या पाच जणांना काल रात्री उशीरा चांदवड आणि मनमाड पोलिसांनी अटक केली.

अटक करण्यात आलेल्या या पाचजणांमध्ये ललवाणी पेट्रोल पंपाच्या दोन मालकांचाही समावेश आहे. तेलभेसळीप्रकरणी पेट्रोलपंपाच्या मालकाला अटक होण्याची ही पहिली वेळ आहे. यावेळीही तेल चोरी करण्यासाठी या माफियांनी डुप्लिकेट चावीचा वापर केल्याचं स्पष्ट झालंय. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 12 हजार लिटर पेट्रोल आणि डिझेलसह टँकर जप्त केलं आहे.

यशवंत सोनवणे हत्याकांडानंतर या ठिकाणच्या तेल माफियांची पाळंमुळं खणून काढू अशा वल्गना सरकारनं केल्या होत्या. परंतु दोन दिवसांत एकापाठोपाठ एक समोर आलेल्या माफियांच्या या रॅकेटमुळे, सरकारचे सगळे दावे फोल ठरलेत. मनमाड परिसरात तेल माफियांचे नेटवर्क पुन्हा सक्रीय झालंय हे यावरून स्पष्ट झालंय.

close