दरवाढीच्या विरोधात आरपीआयचे आंदोलन

June 26, 2011 10:05 AM0 commentsViews: 7

26 जून

घरगुती गॅस, रॉकेल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आजही राज्यभरात निषेध सुरूच आहे. इंधन दरवाढी विरोधात आज पुण्यात आरपीआयने पुण्यात आंदोलन केलं. पुण्यातील दांडेकर पूल चौकात केलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं. सर्व पक्षांकडून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात येत असून देशभरात दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहेत.तर नाशिकमध्ये घरगुती गॅस दरवाढीविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या आहे. नाशिकजवळच्या पंचक गावात भाववाढीमुळे संतापलेल्या महिलांनी सिलेंडरच्या गोडावूनलाच टाळ ठोकले आहे. महागाईमुळे कंबरड मोडलेल्या नागरिकांना या दरवाढीमुळे बेजार केलं आहे. त्यामुळे देशभरात या दरवाढीचा निषेध होतोय. दरवाढीचा भडका थेट किचनमध्ये झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी सिलेंडरच्या गोडाऊनलाच टाळं ठोकलं.दुसरीकडे नाशिक पुणे महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. द्वारका सर्कलवर त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवसेनेच्या वाहतूक सेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं होतं. इंधन दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं. पोलीसांनी यावेळी 15 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

close