कोल्हापूरच्या रंकाळा तलावात सापडला अनोखा मासा

June 26, 2011 11:51 AM0 commentsViews: 178

26 जून

कोल्हापुरातल्या रंकाळा तलावात एक वैशिष्ट्यपूर्ण मासा सापडला आहे. रंकाळा तलाव पर्यटनाबरोबरच जैवविविधतेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. यात विविध वैशिष्ट्यपूर्ण माशांच्या जाती आढळतात. कोल्हापुरातील कृष्णात साळोखे यांना रंकाळ्यात मासे पकडत असताना हा अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असा मासा सापडला आहे. सव्वा फूट लांबीच्या माशाची त्वचा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्य माशाप्रमाणे यावर खवल्या नसून मगरीच्या काटेरी त्वचेप्रमाणे याची त्वचा आहे.

close