2011 मध्ये फॉर्म्युला वन कार रेस भारतात यशस्वी होणार

November 12, 2008 5:53 PM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर दिल्ली एरवी राजधानी दिल्लीच्या राजपथवर वर्षातून एकदा लोक जमतात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वज संचलनासाठी. पण नुकतीच इथं गर्दी झाली एका वेगळ्या कारणासाठी. इथं जमलेले शेकडो तरुण आसुसले होते रेनॉ कारच्या दर्शनासाठी. रेनॉची खरीखुरी फॉर्म्युला वन कार. या कारचं नुसतं दर्शनच नाही, तर काहींना कारमध्ये बसण्याची संधीही मिळाली. त्यामुळे तरुण वर्ग बेहद खुश होता. दिल्लीकरांनी रेनॉ कारला दिलेल्या प्रतिसादामुळे रेनॉ कंपनीचे ड्रायव्हरही थक्क झाले. 2011 मध्ये फॉर्म्युला वन कार रेस भारतात होईल, तेव्हा ती रेसही नक्कीच यशस्वी होईल असा निर्वाळा त्यांनी देऊन टाकला.

close