सायनाचं इंडोनेशियन स्पर्धेचं विजेतेपद हुकलं

June 26, 2011 10:23 AM0 commentsViews: 9

26 जून

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे इंडोनेशियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद हुकलं आहे. फायनलमध्ये सायनाला चीनच्या यिहान वॉंगने पराभूत केलं आहे. गेल्यावर्षी सायनाने भारतीय ग्रांप्री स्पर्धा, सिंगापूर सुपरसीरिज आणि इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने कॉमनवेल्थ गेम्स आणि हॉंगकॉंग सुपरसीरिजमध्ये विजय मिळवला होता. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सायनाने तैईपैच्या शिओ चेंगचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. सायना जर ही स्पर्धा जिंकली असती तर तिचं हे सलग तिसरं विजेतेपद ठरलं असतं.

close