एपीआय घोटाळा प्रकरणी ‘एनओसी’ न घेताच एमआयडीसीची मान्यता

June 26, 2011 2:13 PM0 commentsViews: 6

26 जून

औरंगाबादमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतील एपीआय कंपनीचा भूखंड घोटाळा आयबीएन लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आणखीही नवीन नवीन घोटाळे बाहेर पडत आहे. एपीआय कंपनीच्या भूखंडावर होत असलेले बांधकाम नियमबाह्य तर आहेच पण या बांधकामावर 20 लाख रुपयांचा कर माफ करण्यात आला आहे.

या बांधकामालासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच एमआयडीसीने मान्यता दिली. आणखी एक धक्कादायक म्हणजे अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र औरंगाबाद नाही तर चक्क मुंबई अग्निशमन केंद्राकडून घेण्यात आलं.

या भूखंडावर बांधलेला प्रोझोन मॉल आणि ब्लू वेल्स या निवासी वसाहतीला मालमत्ता कर आकारण्यात आलेला नाही. आयबीएन लोकमतच्या दणक्यानंतर आता महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

close