माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यात मुक्कामी

June 26, 2011 11:05 AM0 commentsViews: 12

26 जून

संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे. काल मरीआई गेटजवळ दोन्ही पालख्यांचा संगम झाला. त्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पासोड्या विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावल्या आहेत. आजही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. पुणेकरांनी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. उद्या सकाळी दोन्ही पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

close