जे.डे हत्येमागे छोटा राजन गँग ; 7 जणांना अटक

June 27, 2011 10:01 AM0 commentsViews: 3

27 जून

पत्रकार जे. डे हत्याप्रकरणाचा कट उलगडण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. छोटा राजननेच जे. डेंच्या हत्येची सुपारी दिली होती असं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. छोटा राजनने शूटर सतीश काल्या याला जे. डेंच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली.

काल्याने यासाठी अनिल वाघमोडे, अभिजीतसह इतर चार जणांची मदत घेतली. आरोपींनी जे. डेंच्या हत्येसाठी परेलमधील पेनिन्सुला सेंटर आणि पवईतील हिरानंदानी असे दोन टार्गेट निश्चित केले. काल्या आणि वाघमोडेने 9 आणि 10 जूनला हिरानंदानीची रेकी केली.

3 मोटारसायकल आणि एका क्वालीस गाडीतून जे. डेंचा पाठलाग केला. आणि स्पेक्ट्रा बिल्डिंगजवळ जे. डेंना गोळ्या घातल्या. आरोपींकडून 3 मोटारसायकल, 1 क्वालीस गाडी, 10 मोबाईल्स जप्त करण्यात आलेत. पण, जे. डेंच्या हत्येचं नेमकं कारण काय हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीय.

close