कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात

June 26, 2011 11:32 AM0 commentsViews: 7

26 जून

कोल्हापूरमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. दसराचौक इथं झालेल्या लोकोत्सव सोहळ्यात झांज आणि लेझीमचे कलाप्रकार सादर करत विद्यार्थ्यांनी राजांना अभिवादन केलं. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत शाहू महाराजांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे चित्ररथ सहभागी झाले होते.

close