अण्णांचा वाढीव मुदत अर्ज कोर्टाने फेटाळला

June 27, 2011 10:19 AM0 commentsViews: 2

27 जून

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जळगाव कोर्टात आज हजेरी दिली. आमदार सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्याच्या सुनावणीसाठी हजारे कोर्टात हजर झाले होते. 2003 साली जळगाव, पुणे आणि मुंबई न्यायालयात आमदार जैन यांनी अण्णा हजारे यांच्या विरोधात दावे दाखल केले. या खटल्यांच्या सुनावणीसाठी अण्णा आत्तापर्यंत एकदाच हजर राहिले आहे.

ते सतत गैरहजर राहात असल्याने जैन यांनी औरंगाबाद हाटकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्याचा आदेश दिल्याने आजच्या सुनावणीसाठी अण्णा कोर्टात हजर झाले. त्यांच्या वतीने ऍड. अतुल रुमाले यांनी कागदपत्रं दाखल करण्यासाठी वाढीव मुदत आणि तारखांना गैरहजर राहण्याची परवानगी कोर्टाला मागितली. यातील वाढीव मुदतीचा अर्ज कोर्टाने फेटाळला असून तारखांना गैरहजर परवानगी अर्जावरील निर्णय राखीव ठेवला आहे.

close