शरद पवारांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचेआदेश

November 12, 2008 6:12 PM0 commentsViews: 4

12 नोव्हेंबर कोलकाताबीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी 1996च्या वर्ल्डकप दरम्यान निधीचा घोटाळा केल्याचा आरोप बीसीसीआयने केला होता. तशी याचिका कोर्टात दाखल केली होती. ही याचिका दाखल करताना बीसीसीआयने सादर केलेलं प्रतिज्ञापत्र खोटं होतं, असं कोलकाता उच्च न्यायालंयाने म्हटलं आहे. त्यासाठी पवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असं म्हटलंय. पवारांबरोबरच निंरजन शहा, रत्नाकर शेट्टी हे बीसीसीआयचे अधिकारीही अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्याला या प्रतिज्ञापत्राबद्दल कसलीही कल्पना नाही असं म्हटलंय. जे प्रतिज्ञापत्र होतं ते बीसीसीआयच्या रेकॉर्डप्रमाणेच होतं. आणि या वियषी आपण आपल्या वकिलांचा सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

close