मुजोर वाळूमाफियाची रहिवाश्यांना मारहाण

June 26, 2011 11:39 AM0 commentsViews: 2

26 जून

बेकायदा वाळू उपशाची तक्रार करणार्‍या रहिवाशांना वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात घडली. शरद कोळी आणि त्याच्या कुटूंबीयांनी ही तक्रार केली होती. त्यांना वाळूमाफियांकडून मारहाण झाली. मोहोळ तालुक्यातील अर्धनारी इथे बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी तक्रार केली होती. माफियांच्या या मारहाणीत तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close