खालापूरमध्ये रेव्ह पार्टी ; पोलीस निरीक्षक निलंबित

June 27, 2011 10:48 AM0 commentsViews: 4

27 जून

खालापूरमधील रेव्ह पार्टीसंदर्भात नार्कोटीक्सचा पोलीस निरीक्षक अनिल जाधव याला निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्तांनी जाधव याच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. पार्टी आयोजकांना मदत केल्याचा आणि ड्रग्ज पुरवल्याचा जाधववर आरोप होता. आतापर्यंत पोलिसांनी 5 जणांसह ऍन्टी नार्कोटीक्सचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनाही अटक केली आहे.

जाधव यांच्यावर या पार्टीच्या आयोजकांना मदत केल्याचा तसेच पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला. मुंबईपासून 60 किलोमीटरवर असलेल्या खालापूर गावाजवळच्या माऊंट व्ह्यू या रिसॉर्टवर ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीवर धाड टाकून रायगड पोलिसांनी 307 जणांना ताब्यात घेतलं होतं.

ही सगळी मुलं मुंबई, पुणे, नवी मुंबई तसेच कोल्हापूरमधली असल्याची माहिती आहे. बियॉन्ड लॉजिक या कंपनीमार्फत फेसबूकद्वारे या रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमधून ड्रग्जही जप्त करण्यात आले. ऍन्टी नार्कोटीक्स विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे या पार्टीला उपस्थित होते. त्यामुळेच त्यांची कसून चौकशी करण्यात आली

अटक केलेल्यांची नावं कुशनकुमार, सुजन कुमार (दोघेही ऑर्गनायझर ) स्नेहजीत उर्फ बिल्टू साजलकर , राहूल खन्ना हॉटेलचा मॅनेजर नार्कोटीक्स विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव तरसुनील घुळे तर विलास उर्फ विक्की शाह हा आरोपी फरार आहे.

एकूण 231 पुरूष आणि 59 महिला पार्टीत सहभागी झालेले होते. ड्रग्जमध्ये 1.9 गांजा, 56.41 ग्रॅम चरस, 43 मिग्रॅ. कोकेन, 1 एमडीएम टॅब्लेट 25 ग्रॅ., शुगर ट्यूब 19.22 ग्रॅ. जप्त केलं. पार्टीच्या ठिकाणाहून 3 लाख 8 हजार रुपयांची कॅशही जप्त केली गेली.

close