डोंबिवलीत पाठीवर भाकरी थापत दरवाढीचा निषेध

June 27, 2011 11:10 AM0 commentsViews: 13

27 जून

वाढत्या इंधन दरवाढ विरोधात आज डोंबिवलीत मनसेने आंदोलन केले. संतज्ञानेश्वरांसाठी मुक्ताबाईने पाठीवर मांडे थापले होते त्याप्रमाणे मनसे सैनिकांनी या आंदोलनात पाठीवर भाकरी थापत आघाडी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. मनसेचे नगरसेवक राहुल चितळे ज्ञानेश्वर झाले होते.

तर एक महिला कार्यकर्ती मुक्ताबाई झाली होती. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या घातल्या होत्या. तर अनेक कार्यकर्ते संत साधू महात्मयाच्या वेशात होते.सर्वेश हॉलपासून सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन डोंबिवलीच्या चार रस्ता इथे आल्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने विर्सजित झाला.

या आंदोलनाच्या वेळेस मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली.आमदार रामदास कदम आणि मनसे शहरप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

close