नाशकात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या

June 27, 2011 11:51 AM0 commentsViews: 4

27 जून

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मार्केट यार्डमध्ये काम करण्यासाठी गेलेली पंधरा वर्षांची हसीना सैय्यद संध्याकाळी घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तिचं अपहरण झाल्याची तक्रार संशयिताच्या नावानिशी नोंदवली होती. रविवारी आठ दिवसांनंतर दगडं बांधलेला तिचा मृतदेह हिरावडीतल्या विहीरीत सापडला. हसीनाचा शोध घेण्यात पोलिसांनी हलगर्जी केल्याची मुलीच्या पालकांची तक्रार आहे.

close