निवडणुकीवरून दंगल घडवणारे आघाडीचे कार्यकर्ते मोकाट

June 27, 2011 12:03 PM0 commentsViews: 3

27 जून

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून दंगल माजवणारे मोखाड्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीन दिवसांनंतरही मोकाट आहेत. मतदानाच्या दिवशी मोखाडा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या दंगलीमध्ये कार्यकर्त्यांनी तुळ्याच्या पाड्यावर हल्ला केला होता.

रस्त्यावर असलेला ट्रॅक्टर, ट्रक, मोटारसायकल, जीप, कार दिसेल ती गाडी कार्यकर्त्यांनी तोडली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरची कुरापत काढत गाड्यांची तोडफोड आणि हाणामारी केली. मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत पण अजूनही एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

close