शेतमालाच्या दरवाढीत एकट्या पवारांनाच का जबाबदार धरलं – आर.आर.पाटील

June 27, 2011 6:08 PM0 commentsViews: 3

27 जून

दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दरवाढीच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. शेतीमालाच्या किंमती वाढत असताना सामुहीक जबाबदारी का घेतली नाही. तेव्हा फक्त पवारांनाच का जबाबदार धरलं गेलं असा सवाल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला. इंधन दरवाढीवर राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनानंतर सत्तेत आहात तर जबाबदारीही घ्यायला शिका असा टोला विलासराव देशमुख यांनी अजित पवार यांना लगावला होता. त्यावर आर.आर.पाटील यांनी विलासरावांना प्रत्युत्तर दिलं.

इंधन दरवाढीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. अजितदादांच्या आवाहनला विलासरावांनी चांगलाच समाचार घेतला. सत्तेत आहात तर जबाबदारीही घ्यायला शिका असा टोला विलासराव देशमुख यांनी अजित पवार यांना लगावला. दरवाढीची जबाबदारी फक्त काँग्रेसवर ढकलणे योग्य नसल्याची टीकाही विलासराव देशमुख यांनी केली होती. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ इथं एका कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी ही टीका केली.

close