हजरत ख्वाजा शामना मिरासाहेब यांच्या उरुसाला सुरूवात

June 27, 2011 2:47 PM0 commentsViews: 4

27 जून

सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या हजरत ख्वाजा शामना मिरासाहेब यांच्या 636 व्या उरुसाला सुरूवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक असलेल्या या उरसासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल झाले आहेत चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करून या उरूसाचा प्रारंभ झाला. हजरत ख्वाजा शामना मिरासाहेब हे सुफी संत होऊन गेले.

सर्व-धर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मिरा साहेबांनी केला. यंदा उरूसाचे 636 वे वर्ष आहे. पंधरा दिवसांसाठी हा उरूस भरवला जातो. समानतेची शिकवण देणा-या मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसाला मानाचा गलेफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो. आणि पोलिसांचा गलेफ अर्पण केला जातो.

close