इशांत पहिल्या वन डेमध्ये खेळू शकणार नाही

November 12, 2008 6:07 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर भारत आणि इंग्लंडदरम्यान सात वनडे मॅचची सीरिज सुरू होतेय. यातली पहिली वन डे येत्या चौदा तारखेला राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द चमकदार कामगिरी करणारा फास्ट बोलर इशांत शर्मा नसेल. कारण पायाला झालेल्या दुखापतीमुळे इशांत पहिल्या वन डेमध्ये खेळू शकणार नाही. इशांतच्या डाव्या पायाचा घोटा दुखावलाय. आज त्याची एम आर आय टेस्ट करण्यात आली. त्यानंतर तो पहिली वन डे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.पण दुस-या वन डेपर्यंत इशांत फिट होईल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे इशांतऐवजी बदली खेळाडूची निवड करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या टेस्ट सीरिजमध्ये इशांतनं पंधरा विकेट घेत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता.

close