रेव्ह पार्टीच्या ‘फेसबुक’इव्हेंटवर सायबर सेलची नजर

June 28, 2011 11:32 AM0 commentsViews: 7

28 जून

रेव्ह पार्टीचे आयोजन फेसबूक, ऑर्कुट यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन केलं जातं. त्यामुळे या वेबसाईट्सवर खास लक्ष ठेवण्याच्या सुचना पोलिसांच्या सायबर सेलला देण्यात आल्या आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दरम्यान याआधीच ऍन्टी नार्कोटिक्स सेलमध्ये आपला कार्यकाळ संपलेल्या अधिकार्‍यांची उचलबांगडी करण्याचे आदेश गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहे. खालापूरच्या घटनेमुळे ऍन्टी नार्कोटीक्स सेलच्या कारभारावर शंका व्यक्त होत आहे.

खालापूरच्या रेव्ह पार्टीमध्ये अनेक धनिकांची मुलं सामील झाली होती. ही रेव्ह पार्टी ज्या माऊंट व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या हॉटेलचा मालक अपराजित मित्तल हा शिवसेनेच्या युवासेनेचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी शिवसेनेचं नेमकं काय कनेक्शन आहे याची चर्चा सुरू झाली आहेत.

close