आदर्शची इमारत बेकायदेशीरच राहिलं : पर्यावरण मंत्रालय

June 27, 2011 4:59 PM0 commentsViews: 2

27 जून

आदर्श सोसायटी नियमित करता येणार नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हायकोर्टात सांगितले आहे. आदर्श सोसायटीने कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला. त्यामुळे आदर्शची इमारत बेकायदेशीर आहे ती नियमित करता येणार नाही असं पर्यावरण खात्याने स्पष्ट केलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्यायमूर्ती आर. जी. केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान पर्यावरण खात्याने आपली बाजू मांडली.

close