हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार

June 28, 2011 5:51 PM0 commentsViews: 155

28 जून

पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार आहे. हरियालच्या जागी रानपिंगळा या पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने हरियालला बदलून रानपिंगळ्याला राज्यपक्षाचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या प्रस्तावावर वन्यजीव संरक्षण सल्लागार मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हरियाललाच राज्यपक्षी म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय झाला. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

close