बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

June 28, 2011 9:27 AM0 commentsViews: 3

28 जून

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातल्या आरा न्यायालयाने दिले आहेत. 2008 मध्ये सामनामधून ''एक बिहार सौ बिमार'' हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्याविरोधात ऍड. राजेशकुमार सिंह यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. बाळासाहेब ठाकरेंना न्यायालयाने 2008 मध्ये पहिल्यांदा समन्स बजावलं होतं. यानंतर 2009 मध्ये आणि 2010 मध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. पण बाळासाहेबांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने बाळासाहेबांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

close