कोल्हापुरात जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली

June 28, 2011 10:29 AM0 commentsViews: 2

28 जून

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चौवीस तासात 780 मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात 282 मी.मी इतकी झाली. जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कोल्हापूर – सिंधुदूर्ग मार्गावर दरड कोसळली आहे. हा रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. त्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने दरड हटविण्याचे काम सुरु असून एकेरी मार्गाने वाहातूक सुरु आहे. जिल्ह्याच्या नदी पातळीत पातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदी पातळीतही वाढ झाली आहे.

close