एका षटकाराची पंचविशी…

November 12, 2008 6:22 PM0 commentsViews: 5

12 नोव्हेंबर मुंबईस्वाती घोसाळकरमुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते, आणि क्रिकेटच्या या पंढरीत क्रिकेटपटूंच्या तीन पीढ्या घडवणा-या षटकार ट्रॉफीला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहे. शिवाजी पार्कला भारतीय क्रिकेटरची खाण समजलं जातं. सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर,विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर असे अनेक क्रिकेट सितारे या मैदानानं क्रिकेट जगताला दिले आणि या सगळ्या खेळाडूंत अजून एक साम्य आहे ते म्हणजे सचिन पासून ते आजच्या रोहित शर्मापर्यंत सारेच जण त्यांच्या उमेदीच्या काळात षटकार ट्रॉफीत खेळले आहेत. षटकार ट्रॉफीनं त्यांच्या क्रिकेट करिअरला एक वेगळं वळण दिलं.षटकारचं उद्देश स्पर्धा आयोजित करून त्यातून भरपूर पैसे कमावणं कधीचं नव्हता.तर होतकरू खेळाडूंना एक फ्लॅटफॉर्म उभा करून द्यायचा होता.आणि तो आजतागायत षटकार स्पर्धेनं तो कायम राहिला आहे. मुंबईच्या रणजी टीमचं प्रवेशद्वार म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. मुंबईत वर्षाकाठी आता शेकडोंनी क्रिकेट स्पर्धा होतात पण त्यात षटकार ट्रॉफीनं आपलं वेगळेपण आजही जपलंय.

close