मंत्रिमंडळात फेरबद्दलाची शक्यता ; देवरा, गिल यांना डच्चू ?

June 28, 2011 12:37 PM0 commentsViews: 3

28 जूनकेंद्रीय मंत्रिमंडळात या आठवड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यादृष्टीने बैठकींना सुरुवातकेली आहेत. काही मंत्र्यांना पक्षकार्यात परत पाठवण्याची सोनिया गांधी यांची इच्छा आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री मुरली देवरा यांचे पद जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे मुंबईच्या वाट्याचे एक मंत्रिपद कमी होईल. देवरा यांच्यासोबतच एम. एस. गिल यांचंही पद जाण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या पदांमध्येही फेरबदल होऊ शकतात. गृहमंत्री पी. चिदंबरम यांना संरक्षण मंत्रालयात पाठवलं जाऊ शकतं. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनाही वेगळं खातं मिळण्याची शक्यता आहे. तर तरुण राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना बढती मिळू शकते. उत्तर प्रदेशातल्या निवडणुका लक्षात घेऊन राज बब्बर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मंत्रीपद जाणार? मुरली देवरा- कॉर्पोरेट अफेअर्स एम. एस. गिल- क्रीडामंत्री असे असतील बदल ? पी. चिदंबरम- संरक्षण मंत्रालय एस. एम. कृष्णा- परराष्ट्र खातं जाणार ज्योतिरादित्य शिंदे- बढती मिळणार ? राज बब्बर- मंत्रिमंडळात समावेश ?

close