सत्य साई ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार !

June 28, 2011 10:38 AM0 commentsViews: 8

28 जून

पुट्टपार्थीच्या सत्य साई ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीला आलं आहे. त्यावर आज ट्रस्टच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आंध्र-कर्नाटक सीमेवर पंधरा दिवसांपूर्वी एका क्वालिस गाडीत 35 लाख रुपये रोख सापडले होते. हे पैसे सत्य साई ट्रस्टशी संबंधित असल्याचे तपासात समोर आलं आहे.

याप्रकरणी ट्रस्टी व्ही. श्रीनिवासन यांच्यासह सत्य साईंचे पुतणे रत्नाकर यांची चौकशी करण्यात आली होती. हे पैसे एका भक्ताने सत्य साईंचे स्मारक बांधण्यासाठी दिले होते असा दावा ट्रस्टच्या सदस्यांनी केला. पण, पोलिसांनी जप्त केलेली क्वालिस गाडी ट्रस्टच्या मालकीची नाही असं श्रीनिवासन यांनी सांगितलं.

तसेच ट्रस्ट ताब्यात घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी सत्य साईंच्या खासगी खोलीत 11 कोटी रुपये रोख, 100 किलो सोनं आणि 300 किलो चांदी सापडली होती. हे पैसे आणि दागिने सत्य साईंना कुणी दिले. याबाबत ट्रस्टला माहिती नसल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितलं. पण त्यावरचा टॅक्स भरला असल्याचा दावा मात्र त्यांनी केला.

close