पालकांची फसवणूक करणार्‍या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

June 28, 2011 10:51 AM0 commentsViews: 3

28 जून

पालकांची फसवणूक केल्याबद्दल नाशिकमधील ब्रुकलीन बर्डी शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नसताना संचालकांनी पालकांकडून सीबीएससी बोर्डाच्या निकषांनूसार अवाजवी फी आकारली. मात्र, शाळेला बोर्डाची मान्यता नसल्याचे पालकांनी माहितीच्या अधिकारातून सिद्ध केलं.

त्यामुळेच इंदिरानगर पोलिसांना शाळेविरोधात गुन्हा दाखल करणे भाग पडले आहे. इंदिरा नगर पोलीस स्टेशनमध्ये शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शाळेला बंदोबस्त देण्याची तत्परता दाखवली. आयबीएन लोकमतने संचालकांची बाजू विचारली असता त्यांने पळ काढला.

close