अण्णांचा उद्यापासून देशव्यापी दौरा ; सर्व पक्षांच्या नेत्यांची घेणार भेट

June 28, 2011 6:01 PM0 commentsViews: 2

28 जून

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उद्यापासून देशव्यापी दौर्‍याला सुरुवात करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. 16 ऑगस्टपासून आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे अण्णांनी स्पष्ट केलं.

जंतरमंतरवर आंदोलन करु दिलं नाही तर राजघाटावर करु आणि तिथेही परवानगी नाकारली तर जेलमध्ये आंदोलन करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बाबा रामदेव यांना या आंदोलनात काही अटींवर सामील करुन घेऊ असंही अण्णा म्हणाले. पण त्या अटी कोणत्या हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

close