गर्भलिंग निदान करणार्‍या हॉस्पिटलचा पर्दाफाश

June 28, 2011 2:42 PM0 commentsViews: 7

28 जून

पुण्यामध्ये गर्भलिंग निदान करण्याच्या प्रकाराचा जनवादी संघटनेच्या कार्यकर्त्या किरण मोघे यांनी पर्दाफाश केला आहे. मोघे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरुन आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी डॉ.मकरंद रानडे यांच्या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे. डॉ.रानडे यांचे नागनाथ पार्क जवळ हॉस्पिटल आहे.

त्यांच्याकडे येणार्‍या पेशंटकडून हजारो रुपये घेऊन जवळच असलेल्या निना मथरानी यांच्या नविन डायग्नोसिस सेंटर मध्ये गर्भ लिंग निदानासाठी पाठवत असतं. आरोग्य विभागाने डॉ. रानडे आणि डॉ. मथरानी यांच्या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे. दोन्ही हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

close