…त्या दर्ग्याची चौकशीची छावा संघटनेची मागणी

June 28, 2011 3:09 PM0 commentsViews: 73

28 जून

दर्ग्याचं पाणी पिऊन आजार बरे होतात असा दावा करणार्‍या चाळीसगावच्या बामोशी बाबा ट्रस्टच्या चौकशीची मागणी छावा संघटनेने केली आहे. आयबीएन लोकमतने इथं होणार्‍या अंधश्रद्धेचा बाजार उघडकीस आणला होता. त्यानंतर इथं होत असलेला गैरकारभार आणि भाविकांकडून जमा होणार्‍या पैशांच्या चौकशीची मागणी संघटेनने केली. चाळीसगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात हा बाजार शासनाने बंद करावा असंही त्यांचं म्हणणं आहे.

close