नितीन गडकरींनी ट्रक्टरवर फेरफटका मारला

June 28, 2011 3:27 PM0 commentsViews: 2

28 जून

एरवी विमानात फिरणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अखेर उसंत मिळाली आणि त्यांनी चक्क ट्रॅक्टरवर फेरफटका मारला. वर्धा जिल्हात गडकरींच्या पूर्ती जलसिंचन संस्थेतर्फे तामसवाडा इथं बंधारा बांधण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष असलेल्या गडकरींनी या बंधार्‍याची ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत पाहणी केली. जवळपास 7 किलोमीटरचे अंतर त्यांनी यावेळी ट्रॅक्टरवरून पूर्ण केले.

close