राजापूरमध्ये पुन्हा भूस्खलन ; 18 लाखांचा खर्च पाण्यात

June 28, 2011 3:55 PM0 commentsViews: 2

28 जून

राजापूरमधील शिवणे गावात पुन्हा एकदा भूस्खलन झालं आहे. या गावात जाणारा रस्ताच खचला असून शिवणे गावाचा संपर्क तुटला आहे. रस्त्याला तीन -चार फुटाच्या मोठ्या भेगा पडल्या आहे. सप्टेंबर 2009 मध्ये मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी भूस्खलन झालं होतं. गेल्यावर्षी या रस्त्यावर बांधकाम विभागाने तब्बल 18 लाख खर्च केले. मात्र रस्ता दुसरीकडून नेण्यास गावकरी सांगत असतानाही भुस्खलनाच्याच ठिकाणी पुन्हा रस्ता केल्याने हे 18 लाख वाया गेले आहे. गावकर्‍यांना आता शाळा बाजारात येण्यासाठी तब्बल 15 किलोमीटरची पायपीट करावी लागणार असल्याचे समजतं आहे.

close